Health & FitnessMaharashtra Govमुंबई

कोरोना अपडेट : कुर्ल्यात वेगाने कोरोनाच्या रुग्णांची वाढ

मुंबई: कुर्ला नेहरूनगर आणि टिळकनगर भागात रुग्णांची संख्या वाढत असून या परिसरात शनिवार आणि रविवार या दिवशी एकत्रितपणे विशेष तपसणी मोहीम हाती घेण्यात आली. मुंबई पूर्व उपनगरात गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाढ वेगाने होऊ लागली आहे. पूर्ण मुंबई मध्ये कोरोना वाढीचा दर हा ०.१४ टक्के यावर आला आहे. तर चेंबूर, टिळकनगर भागात हाच दर ०.२८ टक्के एवढा गेला आहे. तसेच कुर्ला विभागातील नेहरूनगर आणि त्याला लागून असलेल्या एम पश्चिम विभागातील टिळकनगर भागात रुग्णवाढ ही होत आहे. त्यामुळे या दोन्ही विभागातील पालिका अधिकारी आणि कर्मचारी यांनी एकत्रित पणे येऊन तपासणी मोहीम हातात घेतली आहे तसेच यां विभागांमध्ये चाचण्या सुरु झाल्या आहेत.

या विभागातील नागरिकांचे शनिवार आणि रविवारी शरीराचे तापमान आणि ऑक्सिजन लेवल तपासण्यात आले. सर्व संशयित लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या. पालिका अधिकारी असेही सांगतात की पालिका दवाखान्या व्यतिरिक्त आणखी १६ ठिकाणी कोरोना चाचणी केंद्र आहेत. तिथे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच विभागात येणाऱ्या प्रत्येकाच्या चाचण्या होत आहेत. तर नेहरू नगर टर्मिनस मधून येणाऱ्या प्रवाशांच्या सुद्धा चाचण्या होत आहेत.

डॉक्टर. जितेंद्र जाधव जे एल विभागाचे आरोग्य अधिकारी आहेत त्यांना असे वक्तव्य केले की, एल विभागात रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आले त्यानंतर आम्ही त्या रुग्णासंख्येचा अभ्यास केला. नेहरू नगर भागात गेल्या पंधरा दिवसात ६३ नव्या रुग्णांची नोंद झाली. ३० वेगवेगळ्या इमारतींमध्ये हे रुग्ण विखुरलेले होते. त्यामुळे इमारत प्रतिबंधित करता येत नव्हती. टिळकनगर येथे ही अशीच परिस्थिती होती. या भागात १०० रुग्ण आढळून आले अशी माहिती त्यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button