Farmersसोलापूर

मोहोळ येथे सहा आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना जिल्हा प्रशासनाची एक लाखाची मदत

मोहोळ : जानेवारी ते जून २०१९ दरम्यान मोहोळ तालुक्यात कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून ७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी सहा शेतकऱ्यांच्या वारसांना जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. याबाबतचे धनादेश तहसील प्रशासनाने मृत शेतकर्‍यांच्या वारसांना दिले. या सातही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी मोहोळ तहसील प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी सहा प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तर एका शेतकऱ्यांच्या वारसदाराला प्रस्ताव नामंजूर झाला असून त्यांचा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button