Maharashtra GovPoliticsनागपूर

राहुल गांधींनी सांगितल्यास आघाडी सरकारमधून बाहेर पडू – विजय वडेट्टीवार

नागपूर : आज काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी अध्यक्ष्यपदाचा राजीनामा देऊ शकतात. मात्र काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सोनिया गांधी यांच्यानंतर राहुल गांधी  यांना पसंती आहे. सोनिया गांधी यांनी संकटात काँग्रेसला सांभाळलं आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांना पसंती आहे, असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

गांधी परिवारातील व्यक्तीच राष्ट्रीय अध्यक्ष व्हावा. राहुल गांधी यांनी चर्चा करुन महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार बनवण्यासाठी संमती दिली होती. अध्यक्ष झाल्यावर राहुल गांधी यांनी सरकारमधून बाहेर पडण्यास सांगितल्यास आम्ही सरकारमधून बाहेर पडत सत्ता सोडू. काँग्रेसजन म्हणून आम्ही हायकमांडच्या निर्णयासोबत आहोत, असंही यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, राहुल गांधी यांना थेट अध्यक्ष बनवण्याची जोखीम काँग्रेस पक्ष सध्या घेऊ इच्छित नाही. सोनिया गांधी यांनी राजीनामा दिल्यास डॉ. मनमोहन सिंह, ए. के. अँटनी किंवा मुकुल वासनिक यांच्या पैकी एका नेत्याला पक्षाचा अंतरिम अध्यक्ष बनवण्यात येऊ शकते, असे सांगितले जात आहे. त्यानंतर करोनाचे संकट दूर झाल्यानंतर पक्ष पुन्हा राहुल गांधी यांच्या हाती पक्षाचे नेतृत्व सोपवेल असे म्हटले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button