MonsoonTravelमहानगरपालिका

सायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी

आज सकाळपासूनच मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईतील कोपरा गावाजवळील सायन-पनवेल महामार्गावर प्रचंड पाणी भरले. जवळपास गुडघाभर पाणी भरल्यामुळे या महामार्गावर सुमारे ३० ते ४० वाहने अडकली आहेत. गेल्याच आठवड्यात खारघरमध्ये ओढा फुटला होता. आजच्या पावसामुळेही या फुटलेल्या ओढ्याने पांडवकड्याहून वाहत येणारे पाणी सायन पनवेल महामार्गावर आले आणि पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली. कोपरागावाजवळील सायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी झाले. पाण्याच्या प्रवाहाने महामार्गावर आल्याने बघता बघता संपूर्ण महामार्ग पाण्याखाली गेला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button