मुंबई

सलून उघडण्यास परवानगी न दिल्यास… नाभिक महामंडळाचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देश मागिल दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमध्ये आहे. अर्थातच अत्यावश्यक सेवेशिवाय सर्वच व्यवहार ठप्प आहेत. त्यातच आता येत्या 1 जूनपासून अनलॉक – 1 ला सुरूवात झाली आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काही उद्योगांना अटीशर्थीसह व्वहारास परवानगी देण्यात आली आहे. परंतु अद्यापही अनेक ठिकाणी काही उद्योग, व्यवसायांवरील निर्बंध कायम आहेत. त्यात ,सलून व्यवसायाचा समावेश आहे. गेले दोन महिन्यांपासून व्यवसाय ठप्प असल्याने अनेक किरकोळ उद्योजक अनलॉक 1 कडे आशेने पाहत होते. मात्र, कोरोनाचा धोका लक्षात घेऊन सलून व्यवसायावरील बंदी कायम करण्यात आली. त्यामुळे आता सलून व्यावसायीकांचा संयम तुटत आहे.

सलून दुकाने उघण्यास परवानगी द्या किंवा मग आम्हाला महिना दहा हजार रुपये आर्थिक मदत द्या असे नाभिक महामंडळाने म्हटले आहे. तसेच ही मागणी मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही महामंडळाने दिला आहे.

महाराष्ट्र नाभिक महामंडळने तसे निवेदन जिल्हा प्रशासनामार्फत सरकारकडे पाठवले आहे.

सरकारच्या टाळेबंदीला सहकार्य करण्यासाठी या सलून व्यावसायीकांनी दोन महीने धीराने काढलेत मात्र, आता आर्थिक अडचण निर्माण झाल्याने त्यांचा संयम तुटला आहे.

22 मे रेजी सलूनला परवानगी दिली होती. परंतु पुन्हा सलून बंद करण्याचा आदेश सरकारने दिला. सलून व्यावपसायीक मोठ्या आर्थिक गर्तेत सापडला आहे. अशावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे मदतीची विनंती केली आहे.

ज्याप्रमाणे कर्नाटक सरकारने सलून व्यावसायिकांसाठी पाच हजार रुपये मदत देण्याचे घोषित केलेतसेच महाराष्ट्र सरकारनेही सलूनची दुकाने सुरू करेपर्यंत महिना दहा हजार रुपये मदत करावी, लाईट बिल माफ करावे व प्रत्येक व्यावसायिकाचा आरोग्यविमा करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

या मागण्यांची दखल न घेतल्यास नाभिक समाज तीव्र आंदोलन करेल व उपोषणाचाही मार्ग अवलंबण्यात येईल असा इशारा नाभिक महामंडळाने दिला आहे.तसे निवेदन सरकारला पाठविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button