Health & FitnessMaharashtra Govबृहन्मुंबई महानगरपालिका - BMCमहानगरपालिकामुंबई

कोरोना अपडेट : मुंबई महानगरपालिकेने केल्या चेंबूर मधील ४ इमारती सील !

मुंबई: मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि पालिकेने कोरोनासंदर्भातील नियम अधिक कडक करण्यास सुरुवात केली आहे. सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मास्क न घालणाऱ्या व्यक्तींकडून दंड आकारण्यात येत आहे. तसेच आता कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ नये यासाठी इमारतीही सील करण्यात येत आहेत. शुक्रवारी चेंबूर येथे पाच किंवा त्यापेक्षा अधिक कोरोना रुग्ण असलेल्या चार इमारती सील करण्यात आल्या आहेत.

पालिका प्रशासनाने येथे मिशन झिरो सुरु केले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. शुक्रवारी शहरात तब्बल 823 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तसेच चेंबूरमधील चार इमारती सील करण्यात आल्या आहेत. आगामी 14 दिवसांसाठी या इमारती सील असतील. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.
मुंबईत शुक्रवारी  कोरोनाचे नवे 823 रुग्ण आढळले असून चेंबूरमधील चार इमारती सील करण्यात आल्या आहेत. हा परिसर दाटीवाटीचा असल्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. आगामी 14 दिवसांसाठी या इमारती बंद असतील. तसच या काळात इमारतीतील नागरिकांना वर्क फ्रॉम होम करावे लागणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे.

नियमांचे उल्लंघन झाल्याने चेंबूर मैत्री पार्क येथील सफल हाईट, चेंबूर पोलीस ठाण्यासमोरील नवजीवन सोसायटी, सिंधी सोसायटी बंगला क्र. १३ मधील साई त्रिशूल आणि आरसी मार्ग मारवली गावाजवळ शिवधाम सोसायटी येथे प्रत्येक इमारतीत कोरोनाचे पाचपेक्षाही जास्त रुग्ण आढळून आल्याने पालिकेने तातडीने सदर चार इमारती सील केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button