Indian RailwayRailways

मध्य रेल्वेने काढली २,५३२ पदांसाठी भरती !

पुणे: महाराष्ट्रातील तरुणांना रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी लवकरच प्राप्त होणार आहे. अशी चांगल्या पगाराची नोकरी या लॉकडाऊन च्या काळात मिळणे ही सगळ्यात मोठी संधी महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी असेल. मध्य रेल्वेने २,५३२ पदांसाठी भरती काढली आहे. ही भरतीची प्रक्रिया मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर या विभागांसाठी असेल.

रेल्वे साठी जश्या भरती परीक्षा होतात तशा या भरती साठी कुठलीही परीक्षा न घेण्याचा निर्णय आहे. फक्त १०वी आणि आयटीआय ला मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. आर. आर. सी च्या संकेतस्थळावर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज हा ऑनलाईन असेल. अर्ज भरण्याची तारीख ६ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२१ पर्यंत असेल. या अर्जाची फी सुद्धा असेल. पण ती निव्वळ १०० रुपये आहे.

आवश्यक पात्रता म्हणजेच एलीजीबीलीटी ही किमान दहावी आणि बारावी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि या पदासाठी आयटीआय प्रमाणपत्र असणे सुद्धा आवश्यक आहे. मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर या विभागातून एकूण २,५०० जागा ह्या रिक्त आहेत. आरआरसी सी च्या https://rrccr.com/Home/Home या अधिकृत संकेतस्थळावरून तुम्ही अर्ज करू शकता तसेच या बाबतीची जास्तीची माहिती मिळवू शकता.

पुण्यातील जागा –
कॅरेज अँड वॅगन डेपो -१२२ पदे
डीझेल लोको शेड- १२१ पदे

मुंबईतील जागा-
कॅरेज अँड वॅगन (कोचिंग)- २५८ पदे
मुंबई कल्याण डीझेल शेड-५३ पदे
कुर्ला डीझेल शेड-६० पदे
सिनिअर डीईई (कल्याण) – १७९ पदे
सिनिअर डीईई (कुर्ला) – १९२ पदे
परळ वर्क शॉप- ४१८ पदे
माटुंगा वर्क शॉप – ५४७ पदे
एस अँड टी भायखळा -६० पदे

भुसावळ मधील जागा
कॅरेज अँड वॅगन डेपो १२२ पदे
इलेक्ट्रिक लोको शेड भुसावळ- ८० पदे
इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह कार्यशाळा- ११८ पदे
मनमाड वर्क शॉप – ५१ पदे
टीएमडब्ल्यू नाशिक रोड- ४९ पदे

नागपूर मधील पदे
इलेक्ट्रिक लोको शेड- ४८ पदे
अजनी कॅरेज अँड वॅगन डेपो- ६६ पदे

सोलापूर मधील पदे
कॅरेज अँड वॅगन डेपो-५८ पदे
कुर्डूवाडी वर्क शॉप- २१ पदे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button