Sportsक्रिकेटक्रीडा

IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला मॉरिस

दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसने आयपीएलच्या हंगामात इतिहास रचला आहे. ख्रिस मॉरिसला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली आहे. ख्रिस मॉरिससाठी राजस्थान रॉयल्सने तब्बल 16 कोटी 25 लाख मोजले आहेत. मॉरीसला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्सही स्पर्धेत होती. पण अखेर मोठी रक्कम मोजत मॉरीसला राजस्थानने आपल्या ताफ्यात घेतलं आहे. मॉरिसची बेस प्राईजही 75 लाख रुपये इतकी होती.

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिस आयपीएल 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळत होता. मॉरिसने 13 व्या मोसमात एकूण 9 सामन्यात त्याने 6.63 च्या इकॉनॉमी रेटने 11 विकेट्स घेतल्या होत्या. मॉरिस ऑलराऊंड प्लेअर आहे. टी 20 सारख्या छोट्या प्रकारात सर्व आघाड्यांवर दमदार खेळी करणाऱ्या खेळाडूची आवश्यकता असते. ते सर्व गुण मॉरिसमध्ये आहेत.

https://twitter.com/rajasthanroyals/status/1362350219040460801

आयपीएलमधील आतापर्यंतचे सर्वात महागडे खेळाडू

2008-महेंद्रसिंग धोनी (6 कोटी)

2009-अँड्यू फ्लिनटॉफ आणि केव्हिन पीटरसन (प्रत्येकी 7.35 कोटी)

2010-कायरेन पोलार्ड आणि शेन बाँड (प्रत्येकी 3.4 कोटी)

2011- गौतम गंभीर (11.4 कोटी)

2012-रवींद्र जडेजा (9.72 कोटी)

2013-ग्लेन मॅक्सवेल (5.3 कोटी)

2014-युवराज सिंग (14 कोटी)

2015-युवराज सिंग (16 कोटी)

2016- शेन वॉटसन (9.5 कोटी)

2017-बेन स्टोक्स (14.5 कोटी)

2018-बेन स्टोक्स (12.50 कोटी)

2019-जयदेव उनाडकत आणि वरुण चक्रवर्ती (प्रत्येकी 8.4 कोटी)

2020-पॅट कमिन्स (15.5 कोटी)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button