Health & FitnessMaharashtra Govजिल्हा परिषद

राज्यात ८९० डॉक्टरांची भरती

आरोग्य विभागात मनुष्यबळ वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात असून याद्वारे अनेक वर्षांचा हा प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. राज्याच्या ग्रामीण भागात डॉक्टरांची संख्या कमी असल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याचे चित्र दिसून येते. याची दखल घेत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात ८९० डॉक्टरांची पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात ८९० डॉक्टरांची भरती; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
राज्यात सरकारी रुग्णालयात महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा ‘गट अ’मधील विशेषज्ञांची एकूण १ हजार ५९७ पदे मंजूर आहेत.

राज्यात सरकारी रुग्णालयात महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा ‘गट अ’मधील विशेषज्ञांची एकूण १ हजार ५९७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ९५४ पदे भरलेली आहेत. तर, ६४३ पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा ‘गट अ’मधील वैद्यकीय अधिकारी आणि ‘आयपीएचएस’अंतर्गत शल्यचिकित्सक, प्रसूती तज्ज्ञ, फिजिशियन आणि बालरोग तज्ज्ञांच्या सेवा पुरविण्यात येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button