Digital Mediaकला आणि साहित्यपुणेमनोरंजनसोशल मीडिया

‘पेपर २ पिक्सेल प्रोडक्शन’चे निर्माते प्रतीक ठाकूर, अरुण प्रभुदेसाई आणि रविंद्र सरोवर घेऊन येत आहेत भव्य हिंदी वेबसिरीज ‘कच्चा आम’

मुंबई/पुणे: भारतीय डिजिटल मनोरंजन क्षेत्रात दर्जेदार, कौटुंबिक आणि अर्थपूर्ण आशयाची निर्मिती करण्यात अग्रस्थानी असलेल्या ‘पेपर २ पिक्सेल प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड’ (Paper 2 Pixel Production Pvt. Ltd.) या नामांकित निर्मिती संस्थेने आपल्या आगामी भव्य प्रोजेक्टची घोषणा केली आहे. ख्यातनाम निर्माते प्रतीक ठाकूर, अरुण प्रभुदेसाई आणि रविंद्र सरोवर (Pratik Thakur, Arun Prabhudesai & Ravindra Sarowar) यांच्या संयुक्त दूरदृष्टीतून आणि मोठ्या निर्मिती मूल्यांसह (High Production Value) साकारलेली ‘कच्चा आम’ ही बहुप्रतिक्षित हिंदी वेबसिरीज उद्या, २४ मे पासून थेट युट्युब (YouTube) वर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे.

“किस्सा गरमियों की छुट्टियों का, हिस्सा पूरी जिंदगी का…” या टॅगलाईनसह येणाऱ्या या सिरीजचे उत्कृष्ट दिग्दर्शन रोहित शिलवंत (Rohit Shilwant) यांनी केले असून, आपल्या कॅमेऱ्याच्या नजरेतून प्रत्येक फ्रेम सुंदरपणे टिपण्याची महत्त्वपूर्ण भूमिका डीओपी सूरज काळे (DOP – Suraj Kale) यांनी बजावली आहे. या सिरीजचा पहिला एपिसोड ‘मामा की शादी’ (Mama Ki Shaadi) प्रेक्षकांना बालपणातील उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या आणि कौटुंबिक जिव्हाळ्याच्या एका अविस्मरणीय प्रवासावर घेऊन जाणार आहे.

निर्मात्यांची दूरदृष्टी आणि भव्य निर्मिती

‘पेपर २ पिक्सेल प्रोडक्शन’ नेहमीच अशा कथांवर भर देते ज्या थेट प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतात. या सिरीजच्या माध्यमातून निर्माते प्रतीक ठाकूर, अरुण प्रभुदेसाई आणि रविंद्र सरोवर यांनी केवळ मनोरंजन नाही, तर प्रत्येक भारतीय कुटुंबाला जोडणारा एक दर्जेदार कौटुंबिक ड्रामा अत्यंत भव्य स्वरूपात सादर केला आहे. कथेची गरज, कलाकारांची अचूक निवड आणि तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट सादरीकरण यांमुळे ही सिरीज डिजिटल विश्वात एक नवा मापदंड (Benchmark) प्रस्थापित करेल, यात शंका नाही.

तगडी स्टारकास्ट

निर्मात्यांनी या सिरीजसाठी अत्यंत प्रतिभावान कलाकारांची निवड केली आहे:

 मुन्ना: शशांक कोठेकर (Shashank Kothekar)

 मां: सायली सोनुले (Sayali Sonule)

 पापा: साहिल परब (Sahil Parab)

 बबलू मामा: प्रशांत कुलकर्णी (Prashant Kulkarni)

 प्रीती: चारुल देशपांडे (Charul Deshpande)

बिझनेस, ब्रँड आणि भव्य आउटडोअर मार्केटिंग पार्टनर्स

निर्मिती संस्थेच्या या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टला व्यावसायिक पातळीवर अधिक मजबूत करण्यासाठी सोनाली सिंग (Sonal Singh) यांनी बिझनेस आणि ब्रँड पार्टनरशिपची (Business & Brand Partnership) धुरा सांभाळली आहे.

या सिरीजची मार्केटिंग स्ट्रॅटेजी ‘क्रिएटिव्ह किडाज’ (Kreative Kidas) चे सागर परदेशी (Sagar Pardeshi) यांच्या नेतृत्वात आखली जात आहे. या सिरीजला भव्य प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी देशातील आघाडीची आउटडोअर मीडिया एजन्सी ‘ग्लोबल अ‍ॅडव्हर्टायझर्स प्रायव्हेट लिमिटेड’ (Global Advertisers Pvt. Ltd.) चे संजीव गुप्ता (Sanjeev Gupta) यांच्या माध्यमातून भव्य आउटडोअर मार्केटिंग (Outdoor Marketing) आणि डिजिटल होर्डिंग्स (Digital Holdings) चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. याशिवाय, ‘एमएम मिठाईवाला’ (MM Mithaiwala) हे मार्केटिंग पार्टनर म्हणून जोडले गेले आहेत, तर ‘घुमोफ्लाय हॉडलिडेझ’ (Ghumofly Holidays) हे अधिकृत ट्रॅव्हल पार्टनर आहेत.

‘पेपर २ पिक्सेल प्रोडक्शन’च्या उत्कृष्ट निर्मिती मूल्यांमुळे, तगड्या स्टारकास्टच्या जोरावर आणि या तगड्या प्रमोशनल कॅम्पेनसह ही हिंदी वेबसिरीज उद्या २४ मे रोजी केवळ युट्युबवर रिलीज होत असून, प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची एक अनोखी पर्वणी ठरणार आहे.

Related Articles

Back to top button