FeaturedMaharashtra Govमुंबई

IAS, IPS अधिकाऱ्यांच्या ‘यशोधन’ मध्येही कोरोनाचा शिरकाव मात्र, फक्त चौथा मजला सील

मुंबईः मुंबईत कोरोनाचे सावट रोजच्या घडीला अधिक गडद होत आहे. सर्वसामान्यासोबतच आता कोरोना पहिले डॉक्टर, पोलीस, मंत्रालय, राष्ट्रपती भवन ते आता मुंबईतील आयएएस, आयपीस बंगल्यातही पोहचला आहे.

चर्चगेट येथील आयएएस आयपीस अधिकरी राहत असलेल्या यशोधन इमारतीत करोनाचा शिरकाव झाला आहे. मात्र, कोरोना जिथे प्रवेश करतो तो संपूर्ण भाग सील करण्यात येतो. परंतू यशोधन ईमारतीत पूर्ण ईमारत सील न करता केवळ ते अधिकारी राहत असलेला चौथा मजलाच सील करण्यात आला आहे.

चर्चगेट परिसरातील दिनशॉ वाच्छा मार्गावर ही इमारत आहे. येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्याने याआधी ही संपूर्ण इमारत सील करण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, पालिकेने त्यावर खुलासा केला असून या इमारतीचा केवळ चौथा मजलाच सील करण्यात आल्याचं म्हटलं आहे. कोविड १९ संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करताना सुधारित पुनर्रचनेनुसार, प्रतिबंधित क्षेत्र म्हणजेच कंटेनमेंट झोन’ व्यतिरिक्त ‘सीलबंद इमारती’ ही आणखी एक वर्गवारी करण्यात आली आहे. एखाद्या परिसरातील एका इमारतीमध्ये एक बाधित रुग्ण किंवा काही संशयित रुग्ण अथवा लक्षणे नसलेले रुग्ण (asymptomatic) आढळून आले असल्यास अशा इमारतीला किंवा त्या इमारतीच्या भागाला ‘सीलबंद’ म्हणून घोषित करण्यात येते. तसे करताना, बाधित (पॉझिटिव्ह) रुग्ण रहात असलेल्या सदनिकेची व इमारतीची परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित इमारत किंवा इमारतीचा काही भाग ‘सीलबंद’ म्हणून घोषित करण्यात येतो. याच निर्देशांच्या आधारे संपूर्ण यशोधन इमारत नव्हे तर या इमारतीतील फक्त चौथा मजला प्रतिबंधित/ सीलबंद करण्यात आला आहे, असं पालिकेनं स्पष्ट केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button