Monsoonवसई-विरार (Vasai-Virar)

पावसामुळे नालासोपाऱ्यातील अतिउच्चदाब केंद्रात तांत्रिक बिघाड; वसई, विरार व नालासोपाऱ्यामध्ये वीज पुरवठा खंडित

महापारेषणच्या नालासोपारा पूर्व धनिवबाग येथील अतिउच्चदाब केंद्रात १००MVA च्या रोहित्रात पावसामुळे रात्री ०३.०० च्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला आहे. या बिघाडामुळे महावितरणच्या चालू यंत्रणेवर अधिक भार आला. यामुळे महावितरणकडून चक्राकार पद्धतीने पूर्व वसई, विरार व नालासोपारा परिसरात भार नियंत्रण करण्यात येत आहे. या कठीण प्रसंगी वसई, विरार व नालासोपारा परिसरातील औद्योगिक ग्राहकांनी, महावितरणच्या विनंतीनुसार सहकार्य करत या कालावधीत वीज वापर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महावितरणला अधिकाधिक घरगुती ग्राहकांना वीज पुरवठा करणे शक्य होत आहे. पुरवठा लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने महापारेषण व महावितरणचे अधिकारी फिल्डवर कार्यरत असून १००MVA चा नादुरुस्त रोहित्र काढण्याचे व १००MVA क्षमतेचे नवीन रोहित्र आणण्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. ग्राहकांनी याप्रसंगी सहकार्य करावे असे आवाहन महावितरण करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button