Policeक्राईम न्यूजमुंबई

रियाचा जामीन अर्ज फेटाळला; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला आता नवे वळण आले आहे . सुशांतची कथित गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक झाली असून तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र रियाच्या वकीलांनी रियाला जामीन देण्याची मागणी केली होती, न्यायालयाने ती फेटाळली आहे.

रियाने चौकशीत सर्वांना सहकार्य केले असून याप्रकरणी एनसीबीने रिमांड मागितलेले नाही. एनसीबीने तिची चौकशी पूर्ण केली आहे त्यामुळे तिला जामीन मिळाला पाहिजे, असे रियाचे वकील मानेशिंदे यांनी म्हटलं होतं, मात्र कोर्टाने रियाचा जामीन फेटाळला आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करताना ड्रग्ज कनेक्शन सापडल्यानंतर चौकशी दरम्यान ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ने अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला अटक केली. रियाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून तिची रवानगी आज भायखळा तुरुंगात होणार आहे.

काल अटकेनंतर रियाची सायन हॉस्पिटलमध्ये मेडिकल टेस्ट करण्यात आली. यानंतर तिला NCB च्या ऑफिसमध्ये नेण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रियाने चौकशीदरम्यान ड्र्ग्स घेतल्याचं कबूल केलं आहे. सुशांत आणि त्याच्या मित्रांसोबत अनेकदा ड्रग्स घेतल्याचंही तिने मान्य केलं आहे. रियाला आज भायखळा जेलमध्ये घेऊन जातील. तर आज तिचे वकील सतिश मानेशिंदे सेशन कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती आहे.

रियाच्या जामिनासाठी तिचे वकील सेशन्स कोर्टात जाणार आहेत. वकील सतीश मानेशिंदे आज सकाळी 10 वाजता सत्र न्यायालयात अपील करतील. भायखळा तुरुंगात नेण्यासाठी सकाळी 9 वाजताची वेळ नियोजित असली, तरी एनसीबी कोर्टाच्या निर्णयासाठी थांबू शकते. त्यामुळे भायखळा तुरुंग की घर असे दोन मार्ग रियासमोर असतील. सेशन्स कोर्टात तिला जामीन न मिळाल्यास हायकोर्ट आणि पुढे सुप्रीम कोर्ट हे पर्याय असतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button