राजकारणविधानसभा

विधानसभा निवडणुकीत एमआयएमला शंभर जागा लढवण्याची इच्छा

आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाने शंभर जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. अशी मागणी एमआयएमकडून प्रकाश आंबेडकर यांच्याकडे करण्यात आली. जिथे एमआयएमचे वर्चस्व आहे आणि त्यांना जिंकण्याची आशा वाटतेय अशा शंभर जागांची यादी एमआयएमने तयार केली असून ती यादी प्रकाश आंबेडकर यांच्याकडे देण्यात आली आहे.

वंचिंत बहुजन आघाडीमुळे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीला मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तसेच प्रस्थापितांना देखील वंचितने धक्का दिला होता. यानंतर काँग्रेसने विधानसभा निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचेही प्रयत्न सुरु केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button