शिक्षण

विधान भवन अभ्यास दौरा करून गुरु नानक महाविद्यालयाची शैक्षणिक वर्षाची सुरुवात

मुंबई – मुंबई येथील सायन, कोळीवाडा जी.टी.बी नगर गुरु नानक वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राज्यशात्र विभाग आणि संविधान क्लब यांनी शैक्षणिक वर्षाची सुरुवात महाराष्ट्र विधान भवन अभ्यास दौरा आयोजित करून केली. हा विधान भवन दौरा प्राध्यापक सुमित खरात यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. या अभ्यास दौऱ्यामध्ये ५० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांनी विधान सभा आणि विधान परिषद सहभागृहाचे कामकाजाचा प्रत्यक्षात अनुभव घेवून सभागृहाचे कामकाज कसे चालते याची माहिती घेतली. ‘गुरु नानक महाविद्यालयाचा राज्यशात्र विभाग हा नेहमीच विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांवर भर देऊन विविध विषय शिकवतो व त्यामुळे विद्यार्थाना विषय समजून घेण्यासाठी मदत होते आणि अभ्यासक्रम सोपा वाटू लागतो.’ असे प्राध्यापक सुमित खरात यांनी सांगितले. विधान भवन अभ्यास दौरा आयोजन करण्यासाठी केलेल्या सहकाऱ्याबद्दल प्रा.सुमित खरात यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पुष्पिन्देर कौर यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button