मनोरंजन

नेटफिल्क्स च्या ‘या’ गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नाहीत !

गेल्या वर्षी म्हणजेच २०२० मध्ये online ओटीटी चा प्लॅटफॉर्म हा खूप वापरला गेला. आणि सध्या तो खूप प्रसिद्ध ही होत आहे. त्यातलाच एक आहे नेटफिल्क्स . नेटफिल्क्स वरील वेब सिरीस आणि सिनेमा, डॉक्युमेंटरीस या खूप प्रसिद्ध होत आहेत. कारण यात तुम्ही सबस्क्रिप्शन भरून हवी ति गोष्ट कधीही आणि कुठेही पाहू शकतात. तर हे नेटफिल्क्स कोणी चालू केले आणि कधी चालू केले या बाबतीत जाणून घेऊया!

नेटफिल्क्स कोणी चालू केले?
१९९७ साली दोन आन्त्रप्रीनेर्स, मार्क राडोल्फ आणि रीड हास्टिंग यांनी ऑगस्ट मध्ये नेटफिल्क्स ची कंपनी काढली. जी आज जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी मनोरंजन वेबसाईट आहे.

नेटफिल्क्स काढण्यामागची संकल्पना
जेव्हा याची स्थापना झाली तेव्हा नेटफिल्क्स हे फक्त डीव्हीडी आणि सिनेमा हे भाड्याने देत असत. आणि त्यांची ही सर्विस हे मेल द्वारा करत असत. म्हणजेच ग्राहकांनी हवा तो सिनेमा किवा त्याची डीव्हीडी मागायची मग नेटफिल्क्स ती घरपोच आणून देणार आणि याचे भाडे नेटफिल्क्स घेणार, जसा तो सिनेम बघून झाला तशी ती डीव्हीडी नेटफिल्क्सला परत द्यायची असा व्यवसाय नेटफिल्क्सचा होता.

नेटफिल्क्सला नेटफिल्क्स हे नाव का पडले?
या नवा मागची संकल्पना ही खूप सोप्पी आहे. ‘इंटरनेट’ वरून ‘नेट’ हे नाव घेण्यात आले आणि ‘फ्लिक’ म्हणजेच ‘सिनेमा किंवा मुव्ही’ याचेच एकत्रीकरण करून ‘नेटफिल्क्स’ हे नाव देण्यात आले.

नेटफिल्क्स मागची प्रेरणा
हास्टिंग आणि रीड हे सांगताना असे सांगतात की, त्यांनी हि सर्विस काढण्याची प्रेरणा हि अमॅझोन च्या ई-कॉमर्स मोडेल वरून घेतली आहे. जसे अमॅझोन ने विविध गोष्टींसाठी एक पोर्टल काढले तसे यांना सुद्धा सिनेमांसाठी एक पोर्टल काढायचे होते. आज नेटफिल्क्स ला १५१ अब्ज पेक्षा जास्त लोकांनी सब्स्क्रीशन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button