MonsoonTravelपालघर

पालघरमधील धबधब्यांवर बंदी घालण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील 2 महिने म्हणजेच 6 सप्टेंबरपर्यंत पालघरमधील 15 धबधबे आणि धरणांवर पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. मनाईच्या आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील 51 (ब) नुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हादंडाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे पर्यटकांसह सहलीचे नियोजन करणाऱ्यांची घोर निराशा झाली आहे. प्रशासनाने या ठिकाणांवर जाण्यास मनाई करण्याऐवजी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.

मनाई आदेशात कोणकोणते धबधबे, तलाव आणि धरणांचा समावेश :

१ काळमांढवी धबधबा, केळीचा पाडा, ता. जव्हार
२. हिरडपाडा धबधबा, ता. जव्हार
३. दाभोसा धबधबा, ता. जव्हार
४. डोम विहीरा खडखड धरण, ता. जव्हार
५. पळूचा धबधबा, साखरा, ता. विक्रमगड
६. वाघोबा खिंड धबधबा, ता. पालघर
७. एैना दाभोण धबधबा, बोईसर
८. पडघा, बोईसर धबधबा
९. देवखोप धरण, पालघर
१०. तांदुळवाडी धबधबा, सफाळा, ता. पालघर
११. झांझरोळी धरण, केळवा रोड पूर्व, ता. पालघर
१२. चिंचोटी धबधबा, वसई
१३. तुंगारेश्वर धबधबा, वसई
१४. वांद्री धरण, गांजे ढेकाळे, ता. पालघर
१५. तिळमाळचा धबधबा, वडपाडा परळी, ता. वाडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button