पुणे महानगरपालिका

तीन महिन्यात महापालिकेने केले चार हजार सहाशे किलो प्लास्टिक जप्त

राज्य सरकारच्या प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने दोन स्वतंत्र भरारी पथकांची नेमणूक केली. या पथकांनी मार्चपासून जून शेवट पर्यंत चौदाशे नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. कारवाई करण्यात आलेल्या नागरिकांकडून १३ लाख २७ हजार रुपये दंड वसूल केला गेला. पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमार्फत प्लास्टिकचे उत्पादन, साठवण आणि विक्री करणारे विक्रेते आणि त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांविरोधात सातत्याने कारवाई केली जाते. त्याशिवाय, भरारी पथकांमार्फत कारवाईचा वेग वाढवण्यात आला आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये केलेल्या कारवाईत आत्तापर्यंत चार हजार सहाशे किलो प्लास्टिक महापालिकेने जप्त केल्याची माहिती घनकचरा विभागप्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button