Finance
पेट्रोल – डिझेलच्या किमतीत वाढ
मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अर्थसंकल्पात नोकरदारांना फारसा दिलासा मिळाला नाही. पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रत्येकी एक-एक रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच सोने-चांदीच्या सीमाशुल्कात २ टक्के वाढ करण्यात आल्याने सोनेही महागणार आहे. सोने-चांदीचे शुल्क वाढवण्यात आले असून १० टक्क्याऐवजी ते आता १२.५ टक्के इतके करण्यात आले.
देशाची पहिली महिला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थमंत्री म्हणून आपला पहिला अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला. मोदी सरकार दुसऱ्यांदा पूर्ण बहुमताने केंद्रात सत्तेत आल्यानंतर या सरकारकडून नोकरदारांच्या मोठ्या आशा होत्या. परंतु, त्या फोल ठरला आहे.



