नाशिक

प्रशासनाकडून कोरोनाचा हिशेब घेण्यासाठी शरद पवार २४ तारखेला नाशिक दौऱ्यावर

नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार येत्या २४ जुलै रोजी नाशिकच्या दौऱ्यावर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या समवेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील येणार आहेत. दुपारी दोनला त्याचे आगमण होईल. त्यानंतरचे नियोजन अद्याप निश्‍चित झालेले नाही. यापूर्वीच्या दौऱ्यात श्री. पवार यांनी प्रशासनाबरोबर बैठक घेताना फक्त निवडक सूचना केल्या होत्या. त्यात कोरोना विषयक चाचण्यांची स्थिती, त्यात किती वाढ करावी, त्याची स्थिती, निष्कर्ष, मृकत्यूदर कसी कमी करता येईल, त्यासाठी नेमकेपणाने काय करावे, नागरीकांना दिलासा मिळेल असे काय काय केले पाहिजे, यांसह प्रामुख्याने कोरोनाचा संसर्ग नियंत्रणावर त्यांचा भर होता. त्यामुळे सध्या कळीचा मुद्दा बनलेल्या नाशिकला ते येत आहेत. त्यामुळे अनेकांना या दौऱ्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.प्रशासनाकडून कोरोनाचा हिशेब घेण्यासाठी शरद पवार २४ तारखेला नाशिक दौऱ्यावर

गेल्या आठवड्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री नाशिकला दौरा करतील, असे म्हटले होते. मात्र आता थेट शरद पवार व आरोग्यमंत्रीच येत आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री येतील, असे समजते. मुख्यमंत्र्यांशी या विषयावर चर्चा झाली आहे. कोरोनावरील उपाययोजनांबाबत शासन अतिशय गंभीरपमे काम करीत आहे. आता शरद पवार तसेच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे शुक्रवारी नाशिकला येत आहेत. कोरोनाविषयक आढावा घेऊन ते सगळ्यांना मार्गदर्शन करतील. नाशिककर कोरोनाला निश्‍चित पराभूत करतील. असे भुजबळ म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button