क्राईम न्यूजठाणे
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा तडकाफडकी राजीनामा
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. ४ जुलै रोजी त्यांनी राजीनामा दिला आहे. तो अद्याप स्वीकारला गेलेला नाही.
एन्काऊंटर स्पेशालिस्ट आणि ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रदीप शर्मा यांनी आपल्या सेवेचा तडकाफडकी राजीनामा दिला. शर्मा यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज दिला असून त्यावर निर्णय येताच शर्मा कार्यभार सोडणार आहेत.
‘सुपरकाॅप’ अशी ओळख असलेल्या शर्मा यांनी 2017 साली ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाचा कार्यभार स्वीकारला होता.
मुंबईतील टोळीयुध्द मोडीत काढून गुन्हेगारी विश्वाचा बिमोड करणार्या प्रदीप शर्मा यांनी एन्काऊंटर करून 113 गुंडांना यमसदनी धाडले होते.

