Maharashtra GovTravelशहर
धुळेकरांसाठी आषाढी एकादशीनिमित्त 200 बस धावणार
विठ्ठल नामाचा गजर करीत परिवहन महामंडळाने आषाढी एकादशीनिमित्त भाविकांच्या पंढरपूर वारीची पुर्वतयारी केली आहे. 7 ते 13 जुलै या काळात महामंडळाच्या धुळे विभागातून यंदा भाविकांना घेऊन 200 बस धावणार आहेत.
पंढरपूर वारीनिमित्त बस 450 फेऱया करून सुमारे दोन लाख किलोमीटरचा प्रवास घडविणार आहे. या पंढरपूर वारीतून महामंडळाच्या धुळे विभागाने एक कोटी रुपयांची उलाढाल करण्याचा निर्धार केला आहे.

यंदा पंढरपुरला धावणाऱया दोनशे बस किमान 450 फेऱया करतील. या फेऱयांमधून 1 लाख 94 हजार किलोमिटरचा प्रवास घडविला जाईल. सुमारे 75 हजार भाविक महामंडळाच्या बसने पंढरपूर वारी करतील. भाविकांच्या या वारीतून महामंडळाच्या धुळे आगाराला एक कोटी रुपयांची उलाढाल होणे अपेक्षित आहे.



