जप्त केलेली नॅशनल हेरॉल्डची इमारत ‘क्वारंटाईन सेंटर’साठी ताब्यात घ्या – आशिष शेलार
मुंबई : वांद्रे येथील ईडीने ताब्यात घेतलेली ‘नॅशनल हेरॉल्ड प्रा. लि.’ ची इमारत, इतर अशा जप्त करण्यात आलेल्या इमारतींसह राज्य सरकाने ‘क्वारंटाईन सेंटर’साठी ताब्यात घ्यावी, असे पत्र भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.
वांद्रे पूर्व येथील "नॅशनल हेरॉल्ड प्रायव्हेट लिमिटेड"ची सुमारे 2 लाख चौ.फु.क्षेत्रफळाच्या ईडीने जप्त केलेल्या इमारतीसह मुंबईत अशा जप्त केलेल्या इमारती कोरंटाईन सेंटरसाठी महाराष्ट्र शासनाने घ्याव्यात, अशी मागणी मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मी पत्राव्दारे आज केली. pic.twitter.com/QAp2z8SlhB
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 9, 2020
याबाबत केलेल्या ट्विटमध्ये शेलार यांनी म्हटले आहे की – वांद्रे पूर्व येथील ‘नॅशनल हेरॉल्ड प्रा. लि.’ ची सुमारे दोन लाख चौरस फूट जागा ईडीने जप्त केलेल्या इमारतीसह, मुंबईत अशा जप्त केलेल्या इमारती ‘क्वारंटाईन सेंटर’साठी महाराष्ट्र शासनाने घाव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मी पत्राद्वारे केली आहे.
आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र


