पुणे लॉकडाऊन : ९४२ कंटेन्मेन्ट झोन’ !
पुणे: पुणे शहरामध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर राज्यातील कोरोनाचे नियम अधिक कडक झाले आहेत असे बोलण्यास हरकत नाही. विना मास्क फिरणाऱ्यांवर तसेच सुपरस्प्रेडरवर पोलिसांचे बारीक लक्ष आहे. पुण्याच्या ग्रामीण भागात सुद्धा कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. काही गावांमध्ये कॉंटेन्मेन्ट झोन सुद्धा केले आहेत. माहितीनुसार समजते की, एकूण ९४२ काँटेन्मेन्ट झोन तयार करण्यात आले आहे. हवेली तालुक्यात तर ३४२ काँटेन्मेन्ट झोन आहेत.
महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वर आल्याने शासनाने पुन्हा लॉक डाऊन करण्याची शक्यता दाखवली आहे. पुण्यात ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत कोरोनाचा संसर्ग कमी झालेला पण मागील काही दिवसात तो पुन्हा वाढला आहे. संसर्ग कमी झाल्याने शासनाने नियम शिथिल केले होते आणि पुण्यातील शाळा कॉलेजेस चालू केली होती. पण हे सर्व सुरु केल्याने पुन्हा कोरोना वाढला आणि संपुर्ण महाराष्ट्र हीच परिस्थिती निर्माण झाली.
पुण्याच्या ग्रामीण भागात तर चक्क कॉंटेन्मेन्ट झोन सुद्धा तयार झाले. पुण्यातील ग्रामीण भाग, एमआयडीसी च्या परिसरातसुद्धा रुग्णवाढ दिसून आली आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा कोविड सेंटर सुरु करायचं का असा प्रश्न उभा राहिला आहे.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १३ तालुके आहेत, तसेच १४ नगरपालिका आहेत. या १३ तालुक्यांमध्ये ६४७ ‘कंटेन्मेंट झोन’ आहेत. त्यात हवेली तालुक्यात सर्वाधिक ३४२, तसेच शिरूर तालुक्यात १५१ ‘कंटेन्मेंट झोन’ आहेत. पुरंदर, वेल्हा, मुळशी, भोर, आंबेगाव या तालुक्यांमध्ये अत्यल्प ‘कंटेन्मेंट झोन’ आहेत. मावळ तालुक्यात १६९, तर बारामती तालुक्यात ६९ ‘कंटेन्मेंट झोन’ आहेत.


