Cyber Crimeक्राईम न्यूज

नोकरीचं अमिष दाखवून महिलेवर अत्याचार, तोतया पोलिस जेरबंद

शिर्डी: शिर्डी येथील महिलेची एका ऍपवर ओळख करुन शिर्डीत पोलिस असल्याचे सांगत नोकरीचं अमिष दाखवुन अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. खोटी माहिती देत महिलेला पोलिस भरतीत मदत करतो असे सांगून बीडच्या तोतया पोलीसाने तिच्याशी शारिरीक संबध जोडून लग्न करतो असे सांगितले. नंतर तिला मारहाण करत तिची फसवणूक केल्याप्रकरणी तोतया पोलिसाविरोधात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या तोतया पोलिसाला अटक केली आहे.

बीडमध्ये राहणारा किरण महादेव शिंदे याने शिर्डी येथील महिलेशी मिशो ऍपच्या माध्यमातून ओळख करत मैत्री केली. तसेच पोलिस असल्याचे बनावट आयकार्ड व फोटो टाकत शिर्डी पोलिस ठाण्यात नोकरीस असल्याचे सांगून तिच्याशी जवळीक वाढवली. पोलिस भरतीत मदत करतो व तु नवऱ्याला सोडून माझ्याशी लग्न कर असे सांगून तिच्याशी शारिरीक संबध ठेवले.

त्यानंतर तो तोतया पोलिस असल्याचा महिलेला संशय आल्याने तिने त्यास विचारणा केली असता महिलेस लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर सदर महिलेने राहाता पोलिसात तक्रार केली. तिची तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे बनावट पोलिसाचे आयकार्ड, पोलिस युनिफॉर्म व फोटो सापडले.

या प्रकरणी तोतया पोलिस किरण शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. गुन्ह्याचा तपास प्रशांत कंडोरे हे करत असून या आरोपीने अजून कुणाची फसवणूक केली आहे का याचा तपास आता पोलिस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button