महापालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळांवर पाचव्या दिवशी १७ हजार ७३० गौरी-गणपतींचं विसर्जन

महापालिकेच्या पर्यायी विसर्जन व्यवस्थेला दीड दिवसांप्रमाणेच पाचव्या दिवशीही गणेश भक्तांनी मोठा प्रतिसाद दिला. महापालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळांवर पाचव्या दिवशी १७ हजार ७३० गौरी-गणपतींचं विसर्जन झालं. तर यापैकी ८ हजार ४२० गणेश मूर्ती आणि ५९१ गौरींचं कृत्रिम तलावात विसर्जन झालं. महापालिकेच्या गणेश मूर्ती स्वीकार केंद्रात ५६४ गणेश मूर्ती गणेश भक्तांनी विसर्जनासाठी प्रदान केल्या. महापालिकेच्या वतीनं दीड दिवस, गौरी-गणपती, सातवा दिवस आणि दहाव्या दिवसासाठी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या विसर्जन व्यवस्थेअंतर्गत शहरात एकूण ११ ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहेत. तर पारसिक रेतीबंदर आणि कोलशेत बंदर बरोबरच मिठबंदर, कळवा आणि गायमुख येथे विसर्जन महाघाट निर्माण करण्यात आले आहेत. मासुंदा तलावावरही दोन ठिकाणी पर्यायी विसर्जन व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.
महापालिकेच्या पर्यायी विसर्जन व्यवस्थेअंतर्गत भाविकांनी पाचव्या दिवशी १५ हजार ६७१ घरगुती गणेश मूर्ती, १३१८ गौरी तर १७७ सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन केलं. मासुंदा येथील कृत्रीम तलावामध्ये घरगुती 1401 गणेशमुर्तींचे आणि 191 गौरींचे विसर्जन करण्यात आले. आहिल्यादेवी होळकर येथील कृत्रीम तलावामध्ये 1120 घरगुती गणेश मुर्ती आणि 120 गौरी, खारेगाव कृत्रीम तलावात 1134 घरगुती गणेश मुर्ती आणि 42 गौरीं, आंबेघोसाळे कृत्रीम तलावामध्ये 435 गणेश मुर्तीं आणि 49 गौरी, रेवाळे कृत्रिम तलावामध्ये 532 घरगुती गणेश मुर्ती, 9 सार्वजिनक गणेश मुर्ती आणि 23 गौरी, मुल्लाबाग येथे 696 घरगुती गणेश मुर्ती, 17 सार्वजिनक गणेश मुर्ती आणि 25 गौरी, खिड़काळी तलावात 318 घरगुती गणेश मुर्ती, 4 सार्वजिनक गणेश मुर्ती आणि 18 गौरी, शंकर मंदीर तलावामध्ये 251 घरगुती गणेश मुर्ती, 9 सार्वजिनक गणेश मुर्ती आणि 19 गौरी तर उपवन तलावात 2 हजार 250 घरगुती गणेश मुर्ती, 44 सार्वजिनक गणेश मुर्ती आणि 104 गौरींचे विसर्जन करण्यात आले. पारसिक नगर येथे बांधण्यात आलेल्या विसर्जन महाघाट 1 आणि 2 मध्ये 1191 घरगुती गणेश मुर्ती, 46 सार्वजिनक गणेश मुर्ती आणि 164 गौरींचे विसर्जन करण्यात आले.
मिटबंदर घाट येथे 760 घरगुती गणेश मुर्ती, 7 सार्वजिनक गणेश मुर्ती आणि 175 गौरींचे विसर्जन करण्यात आले. तर रायलादेवी घाट 1 आणि 2 येथे 3 हजार 171 घरगुती गणेश मुर्ती, 235 गौरी, कोलशेत घाट 1 आणि 2 येथे 1287 घरगुती गणेश मुर्ती, 26 सार्वजनिक गणेश मुर्ती आणि 98 गौरी तसेच दिवा विसर्जन घाट येथे 1125 घरगुती गणेश मुर्ती, 15 सार्वजिनक गणेश मुर्ती आणि 55 गौरींचे विसर्जन करण्यात आले. महापालिकेनं विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख व्यवस्था केली होती.



