राजकारण

आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नियुक्तीनंतर राज्यातील काँग्रेसची संपूर्ण धुरा आता मामा-भाच्याच्या हातात

बाळासाहेब थोरात हे गांधी कुटुंबीयांचे निष्ठावंत आणि निकटवर्तीयही मानले जातात. त्याचप्रमाणे सत्यजित तांबे हे देखील राहुल गांधींच्या निकटवर्तीयांमधील मानले जातात.

थोरात यांच्या नियुक्तीनंतर राज्यातील काँग्रेसची संपूर्ण धुरा आता मामा-भाच्याच्या हातात आहे. त्याचे कारण असे की, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे हे बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत.

एकीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद थोरात यांच्याकडे आहे तर दुसरीकडे युवक काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांचे भाचे सत्यजित तांबेंकडे आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीची जवाबदारी मामा-भाच्याकडे आली असल्याचे बोलले जात आहे.

सत्यजीत तांबे यांनी महाराष्ट्र युवक काँग्रेसची जबाबदारी स्वीकारल्यापासून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. त्यातच त्यांनी वेळोवेळी सरकार विरोधात आक्रमक आंदोलने सुद्धा केल्याची पहायला मिळाली. तर थोरात यांच्याकडे मोठा राजकीय अनुभूव आहे. त्यामुळे मामा-भाच्याची जोडी पुन्हा काँग्रेसला अच्छे दिन आणणार का हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button