Health & FitnessShivSenaकोल्हापूरठाणेराजकारणसांगली-मिरज-कुपवाड (Sangli, Miraj & Kupwad)

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने १०० डॉक्टरांचे वैद्यकीय मदत पथक रविवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी पूरग्रस्त सांगली – कोल्हापूरकडे रवाना

ठाणे शहर आणि जिल्ह्यातील विविध डॉक्टर संघटना, ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने १०० डॉक्टरांचे वैद्यकीय मदत पथक रविवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी पूरग्रस्त सांगली – कोल्हापूरकडे रवाना झाले. या प्रसंगी शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते.

या वैद्यकीय मदत पथकात सर्व तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असून सोमवार पासून सलग ५ दिवस सांगली – कोल्हापूर जिल्ह्यात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रत्येकी १० डॉक्टरांच्या टीम करण्यात आल्या असून ही १० वैद्यकीय मदत पथक विविध भागात तपासणी आणि औषध पुरवठा करतील.

यासोबतच पूरग्रस्त भागातील बांधवांसाठी सॅनिटरी नॅपकिन, टॉवेल, अंतर्वस्त्र, पेस्ट, बिस्किटे आदि सर्व जीवनावश्यक वस्तू सोबत घेतल्या आहेत.

यामध्ये कल्याण आणि उल्हासनगर शिवसेनेच्या वतीने १० हजार चादर/ ब्लॅंकेट, १० हजार नागरिकांना पुरेल एवढ्या मोठ्या प्रमाणात पुरुष आणि महिलांच्यासाठी सर्व प्रकारचे कपडे, १० हजार नागरिकांना पुरेल एवढे अन्नधान्य आणि खाद्यतेल, बिस्किटे आणि खाद्यपदार्थ याचे वितरण करण्यात येणार आहे.
वैद्यकीय मदत पथक सोबतच हे सर्व जीवनावश्यक सामान रविवारी सांगली / कोल्हापूरकडे रवाना झाले.

राज्याचे आरोग्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे गेले ४ दिवस कोल्हापूर-सांगली परिसरात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तळ ठोकून आहेत. तिथे वेगवेगळ्या छावण्यांमध्ये श्री. शिंदे यांच्या पुढाकाराने निवास आणि जेवणाची सोय केली जात आहे. तसेच, आवश्यक त्या व्यक्तींवर वैद्यकीय उपचार देखील केले जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button