मनोरंजन

‘गर्लफ्रेंड’ च्या प्रमोशनसाठी अमेयची हटके स्टाइल !

अमेय वाघ म्हटला की त्याचा स्वॅग हा येतोच! त्यात जर गोष्ट त्याच्या आगामी सिनेमाची असेल, तर मोठी हवा व्हायलाच हवी, त्यासाठी तो आपल्या स्टाइलमध्ये विविध प्रयोग करतानाही दिसून येणार आहे. आपल्या टीमशी संवाद साधत, विविध प्रकारचे फॅशनेबल कपडे तो परिधान करणार आहे. याआधी ‘फास्टर फेणे’, ‘मुरांबा’ या चित्रपटांच्या प्रमोशन वेळी देखील अमेयने आपल्या हटके स्टाइल वर भर दिला होता. अगदी तसेच, आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याने आपली फॅशन लाॅक केली अाहे.

अमेयचा ‘फास्टर फेणे’ खूप चालला. तो टीव्ही शोज चे सूत्रसंचालन, नाटक, भाडीपा सारखा मंच ई मध्ये खूप बिझी असतो. आता त्याचा सई ताम्हणकर सोबत एक नवीन चित्रपट येतोय, ज्याचे नाव आहे ‘गर्लफ्रेंड’. सिनेमा असो वा नाटक असो अमेय नेहमी सरसच राहिला आहे. त्यामुळे गर्लफ्रेंड सिनेमाच्या प्रमोशनदरम्यानही तो त्याच्या हटके लुक्सने प्रेक्षकांची मने जिंकेल, यात शंका नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button