BJPMaharashtra Govतंत्रज्ञानमुंबईशहर

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या संकेतस्थळाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले.

भारत हा विविध धर्म, जाती, जमाती व अनेक भाषांचा देश आहे. समाजातील विविधता व सर्व जाती, जमातींची सांस्कृतीक पंरपरा कायम ठेवण्याकरिता सर्व नागरिकांना संरक्षण देणे आवश्यक आहे. तसेच सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्टया मागासलेल्या वर्गांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी अनुकूल धोरण व कार्यक्रम ठरविणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्ष पदावर हाजी अरफात शेख यांची निवड झाल्यानंतर त्यांनी तब्बल ३० जिल्ह्यांचा दौरा करत अल्पसंख्याक समाजाच्या समस्या जाणून घेतल्या.

शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना, सवलती याची मुद्देसूद माहिती महाराष्ट्रातील तमाम अल्पसंख्याक समाजापर्यंत पर्यंत पोहचण्याकरिता अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी अल्पसंख्याक मंत्री विनोद तावडेंसमोर अल्पसंख्याक आयोगाचे संकेतस्थळ सुरु करण्याचा प्रस्ताव मांडला त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत अल्पसंख्याक आयोगाच्या संकेतस्थळाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

आज महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या संकेतस्थळाचे https://msmc.maharashtra.gov.in उदघाटन सह्याद्री गेस्ट हाऊस, मलबार हिल येथे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक तथा उच्च तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख आणि प्रधान सचिव श्याम तागडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button