राजकुमार राव आणि जानव्ही कपूर यांच भीतीदायक लग्न ! नवीन ‘रुही ‘ सिनेमा लवकरच !
मुंबई: बॉलिवूड अभिनेते राजकुमार राव आणि जानवी कपूर आता हास्याने तुम्हाला घाबरवण्यास तयार आहेत. या दोघांचा बहुप्रतिक्षित हॉरर कॉमेडी फिल्म ‘रुही अफझाना’ आता ‘रुही’ (रुही) या नवीन नावाने रिलीज होण्यास तयार आहे. राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांनी दोघांनी असे सांगितले की रुही ११ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्याने सोमवारी आपल्या इंस्टाग्रामवर एक मोशन पोस्टर शेअर केला. जानव्ही कपूर हिने तिच्या सोशल मीडियावर असा टाकला आहे की “अब मर्द को ज्यादा दर्द होगा” आणि असे म्हणत सिनेमाचा ट्रेलर शेयर केला आहे.
ट्रेलर मधून असे कळते की, जानव्ही कपूर ला एका भूतबाधा झालेल्या मुलीची भूमिका देण्यात आली आहे. तर राजकुमार राव आणि वरून शर्मा प्रेक्षकांना हसवण्याचा काम करतील. या चित्रपटावरून तो एक हॉरर कॉमेडी असल्याचे कळते. राज कुमार राव चा स्त्री हा श्रद्धा कपूर सोबतच चित्रपट खूप चालला होता. आता प्रेक्षक या ‘रुही’ बाबत उत्सुक असतील असे म्हणण्यास हरकत नाही.

