मनोरंजन
‘पॉवरी गर्ल ‘ नक्की आहे तरी कोण ?
काहीच दिवसांपूर्वी यशराज मुखाते त्याच्या ‘ रसोडे मे कोन था?’ या विडिओ नंतर बरेच मिम सॉंग्स टाकलेत आणि आता त्याने नुकताच टाकलाय नवीन व्हिडियो तोच म्हणजे ‘यहा पॉवरी हो रही है’ अस एक मुलगी बोलत आहे याचा. या व्हिडियोला चक्क ४ दिवसातच १. ५ कोटी व्हियूस मिळाले आहेत. तर नेटिझन्स मध्ये ही सुंदर मुलगी कोण आहे आणि ती कुठे राहते याबाबद्दल चर्चा होत आहे. काहींनी तर तिच्यावर अनेक युट्युब व्हिडियोस बनवले आहेत. हि मुलगी पाकिस्तानी असून तिचे नाव दाननिर मोबीन आहे आणि ती १९ वर्षाची असून पाकिस्तानी इन्फ्लूएंजर आहे.
तिच्या व्हिडियोमध्ये ती असा बोलते की, “ये हमारी कार, ये हम हैं और ये हमारी पार्टी हो री है।” या व्हिडियोमध्ये तिने खरतर श्रीमंत लोकांवर टीका केली आहे. ती त्यांच्या क्लास बाबतीत आणि त्यांच्या अभिमान बाबत बोलताना तिने हा व्हिडियो टाकला आहे. पाकिस्तानचा एक चांगला भाग दारिद्र्यात डुंबला असताना या वर्गाने मोठ्या संख्येने मेळाव्यासाठी त्यांची आर्थिक क्षमता अभिमानाने कशी बदलली हे वर्णन करण्यासाठी तिने बनावट इंग्रजी उच्चारण वापरले. या व्हिडीओला फॉरमॅट म्हणून वापरता येईल अशा प्रकारच्या मेम्स बनवण्यासाठी तिने लोकांना प्रोत्साहित केले.

