डोंबिवलीतील श्रद्धा विकास पाटील हिने बनवले रबर स्टॅम्प च्या १९,००० ठश्यातुन छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र !
२२ वर्षीय तरुणीचा अनोखा प्रयत्न!
डोंबिवली: १९ फेब्रुवारी म्हणजेच शिवजयंतीच्या दिवशी श्रद्धा पाटील या २२ वर्षीय मुलीने महारांजाना मानवंदना देण्यासाठी एक अनोखा प्रयत्न केला. तिने चक्क १९,००० वेळा ठशे पाडून महाराजांची प्रतिमा तयार केली. तिला या संकल्पने बाबत विचारले असल्यास तिने असे सांगितले की, “मी २७ जानेवारी २०२१ ला छत्रपती शिवाजी महाराज यांची माचीस च्या काडीने १० बाय १० मध्ये प्रतीमा साकारली होती त्याच कारण एकच होत की छत्रपती शिवाजी महाराज हे जयंतीला आपल्याला आठवतात तर ते इतर वेळेस सुध्दा त्यांचा जयजयकार झाला पाहिजे हा एक हेतू होता आणि १९ फेब्रुवारीला आपल्या कडुन एका कलेच्या माध्यमातुन महाराजांना मानवंदना द्यावी यासाठी मी रबर स्टॅम्प ने ‘जय शिवराय’ ह्या नावाने प्रतिमा साकारली” तिला तिने ही प्रतिमा कुठे तयार केली असे विचारले तेव्हा ती बोलली की ही प्रतिमा तिने डोंबिवलीतील सांगावं येथे सागेश्वर मंदिरात तयार केली. महाराजांना एक अनोखी वंदना तिने यावेळी शिव जयंतीला दिली.
ही प्रतिमा बनवण्याचा उद्देश काय होता असे विचारले तेव्हा ती बोलली की, ” महाराजांचा बरेच लोक हा एकेरी उल्लेख करतात. बर्याच वेळा काही लोकांना सांगून समजत नाही म्हणून जय शिवराय हा स्टॅंप बनवुन प्रतिमा मी साकारली” ही प्रतिमा बनवलायला तिला एकूण चार तासांचा अवधी लागला आणि तिने ही प्रतिमा बनवायला रात्री चालू केले. श्रद्धा ही फक्त २२ वर्षाची असून ती प्रोफेशनने एक आर्टिस्ट आहे तरुण होतकरू जे महाराजांच्या नावाखाली काहीही करायला बघतात त्याबाबत असे मत दिले आहे की आपण आज ज्या महाराष्ट्रात उभे आहोत आपल्या आई, बहिणी जिथे सुरक्षित आहेत ते सगळे महाराजांमुळेच आहे. आणि जे तरुण महाराजांच्या नावाखाली काहीही करतात त्यांनी हे थांबवलेच पाहिजे.” कलेच्या माध्यमातून वेगळ काही करून लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न ती नेहमीच चालू ठेवेल असही ती सांगते.


