Health & Fitnessपुणे

पुण्यामध्ये कोरोना मृत्युदर २ टक्क्यांवर!

पुणे: पुणेकरांसाठी खुशखबर आहे कारण पुण्यातील कोरोनाचा मृत्युदर हे ११टक्क्यांवरून २ टक्क्यांवर आला आहे. मार्च २०२० पासून सर्वांनी कोरोनाशी मृत्यूची झुंज देऊन त्याला नियंत्रित आणण्याची साठी प्रयत्नांची शर्थ केली. आता १० महिन्यांनी याला फळ आले आहे

पुण्यातील कोरोना मृत्युदर कमी झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याने दिली आहे. मात्र धोका पूर्णपणे टाळला नाही असे ही त्यांनी सांगितलेआहे. त्यामुळे सर्व नियम पाळायचे आहेत. असे आवाहन ते देतात.

महाराष्ट्र मध्ये आतापर्यंत २० लाख ४१ हजार ३९८ लोकांना कोरोना झाला. पण आता हा रुग्णांचा दर खाली येत आहे. पुण्यातील हा रेट हा सर्वाधिक रिकवरी रेट असल्याचे कळते. पुण्यामध्ये वैद्यकीय सुविधा, औषधे, आणि पायाभूत सुविधा ह्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने रिकवरी रेट हा ९६.०५ टक्के इतका झाला आहे असे तज्ञांचे म्हणणे आहे.

महितीनुसार, पुण्यातील पहिला कोरोनामुळे झालेला मृत्यू हा ३० मार्च ला झाला होता. या नंतर ११.४ टक्क्यांपर्यंत मृत्युदर हे वाढले. आणि १० महिन्यांनी आता हा दर २ टक्क्यांपर्यंत आला आहे. साथरोग सर्वेक्षण अधिकार डॉक्टर.प्रदीप आवटे असे म्हणतात कि, जरी मृत्युदर कमी झाला तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे. कारण, ब्राझील इंग्लंड मध्ये या विषाणूंच्या जनुकीय रचनेत बदल होऊन त्याने पुन्हा डोके वरती काढल्याचे दिसते. त्यामुळे मास्क वापरणे, हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे हे नियम पाळणे अनिवार्य आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button