ठाणे शहरमनोरंजनलाईफस्टाईल
जिल्ह्याच्या काही भागात वीजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा

वेधशाळेनं पुढील २४ तासात उत्तर कोकणामध्ये वीजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर कोकणाच्या काही भागात म्हणजे बृहन्मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी वादळी वा-यासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. आज सकाळी साडेआठपासून उद्या सकाळी साडेआठ पर्यंत वेधशाळेचा हा इशारा लागू राहणार आहे.


