ठाणे शहरमनोरंजनलाईफस्टाईल

ठाण्यातील प्रभाग क्रमांक १५ ए मध्ये लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता

ठाण्यातील प्रभाग क्रमांक १५ ए मध्ये लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. या प्रभागातील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सुवर्णा कांबळे यांचं नगरसेवक पद रद्द झाल्यामुळं ही पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. वागळे इस्टेट मधील १५ ए हा प्रभाग अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव होता. या प्रभागातून सुवर्णा कांबळे निवडून आल्या. मात्र त्यांना आपलं जात प्रमाणपत्र सहा महिन्याच्या आत सादर करता आलं नव्हतं. त्यामुळं त्यांचं नगरसेवक पद रद्द झालं. त्या विरोधात सुवर्णा कांबळे यांनी न्यायालयात दाद मागितली होती. मात्र नंतर त्यांनी न्यायालयात केलेलं अपील मागे घेतलं. त्यामुळं महापालिकेनं आता निवडणूक विभागाकडे पोटनिवडणुकीसाठी तारीख कळवण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button