‘ड्रग्स फ्री मुंबई’ मोहिमेला वेग; मुंबई पोलिसांचा 100 हून अधिक शाळांमध्ये जनजागृती अभियान
मुंबईला अमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘ड्रग्स फ्री मुंबई’ मोहिमेअंतर्गत मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने (Anti-Narcotics Cell) मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम हाती घेतली. या उपक्रमांतर्गत 100 हून अधिक महापालिका शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांपर्यंत एकाच वेळी ऑनलाइन माध्यमातून पोहोचत अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.
विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या धोक्यांची माहिती
या विशेष सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर परिणाम समजावून सांगण्यात आले. व्यसनामुळे व्यक्तीचे आरोग्य, शिक्षण, कुटुंब आणि भवितव्य कसे धोक्यात येते, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
🔸As part of the #DrugsFreeMumbai campaign, Mumbai Police’s Anti-Narcotics Cell conducted a large-scale awareness initiative across 100+ municipal schools simultaneously, reaching thousands of students through online session.
Students were sensitized about the physical, mental,… pic.twitter.com/Ga9PpeBk4y— मुंबई पोलीस Mumbai Police (@MumbaiPolice) July 13, 2026
पुरवठा आणि मागणी दोन्ही रोखण्यावर भर
मुंबई पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी कठोर अंमलबजावणीसोबतच जनजागृतीलाही प्राधान्य दिले आहे. ड्रग्जचा पुरवठा रोखण्याबरोबरच त्याविषयीची मागणी कमी करण्यासाठी विविध स्तरांवर मोहिमा राबविल्या जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन
अमली पदार्थांची विक्री, तस्करी किंवा सेवन यासंदर्भातील कोणतीही माहिती असल्यास ती तात्काळ पोलिसांना कळवावी, असे आवाहन मुंबई पोलिसांनी नागरिकांना केले आहे. समाजाच्या सक्रिय सहभागातूनच ड्रग्जमुक्त मुंबईचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते, असेही पोलिसांनी म्हटले आहे.



