LokSabhaShivSenaअधिवेशन

संसदीय गटाचे नेते श्रीकांत एकनाथ शिंदे यांची अधिवेशनापूर्वी सर्व खासदारांसोबत बैठक

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आज (20 जुलै) सुरूवात झाली आहे. त्याआधी शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक संसदीय गटाचे नेते श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पार पडली. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खासदारांसोबतच्या या बैठकीला महत्व प्राप्त झाले. यावेळी खासदार संजय दिना पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार संजय देशमुख आणि खासदार नागेश पाटील आष्टीकर उपस्थितीत होते. तसेच खासदार मिलिंद देवरा, खासदार नरेश म्हस्के आणि खासदार रविंद्र वायकरही उपस्थितीत होते.

शिवसेनेच्या बैठकीत रणनीतीवर चर्चा

अधिवेशनादरम्यान संसदेत कोणते मुद्दे उपस्थित करायचे, विविध विधेयकांबाबत पक्षाची भूमिका काय असणार आणि राष्ट्रीय प्रश्नांवर शिवसेनेची रणनीती कशी असेल, याबाबत खासदारांच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही बैठक फार महत्वाची होती. शिवेसेनेत सामील झालेल्या सर्व खासदारांच्या बैठकीकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते. अधिवेशनात ते कोणती भूमिका घेणार, तसेच केंद्र सरकारच्या विविध विधेयकांवर त्यांचा दृष्टिकोन काय असेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.

संसदेत सरकार-विरोधकांमध्ये जोरदार संघर्षाची शक्यता

यंदाच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारकडून अनेक महत्त्वाची विधेयके आणि धोरणात्मक प्रस्ताव मांडले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे विविध मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची दाट शक्यता आहे. यासोबत संसदेत जोरदार चर्चा आणि वादविवाद रंगण्याची चिन्हे आहेत.

अधिवेशनात महाराष्ट्रातील प्रश्नांवरही भर?

राज्यातील विकासकामे, शेतकरी प्रश्न, पायाभूत सुविधा, रोजगार आणि इतर महत्त्वाच्या विषयांवरही खासदारांकडून संसदेत आवाज उठवला जाऊ शकतो.

Related Articles

Back to top button