राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत – चंद्रकांत पाटील
मुंबई : राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत. असे विधान पुन्हा एकदा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे तसेच यापूढे आम्ही कोणतीही निवडणूक शिवसेनेसोबत एकत्रित लढणार नाहीत. असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहेत.
चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनसोबत एकत्र यायला तयार आहोत. मात्र, यापूढे कोणतीही निवडणूक एकत्रित लढणार नाही. यावर आपण ठाम आहात का असा प्रश्न त्यांना केला असता, राजकारणात कोणताही निर्णय, भूमिका ही आयुष्यभरासाठी काय असेल हे आत्ताच सांगता येत नाही. आताच्या घडीला कार्यकर्त्यांच्या या भावना आहेत त्या मी सांगतोय असोही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर आता शिवसेना काय प्रत्युत्तर देते याकडे राज्याच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, काल भाजपाची राज्य कार्यकारीणीची बैठक झाली. या बैठकीला भाजपाअध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी संबोधित केले होते. तेव्हा महाराष्ट्रात सरकार आणण्याच्या तयारीला लागा असा आदेश नड्डा यांनी दिसल्याचे वृत्त आहे. त्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीची झोप उडेल असे विधान केले आहे. यावर शिवसेना काय प्रतिउत्तर देणार हे पाहावे लागेल.


