Maharashtra Govमनोरंजन

पे चॅनेलचे चार महिन्यांचे शुल्क माफ करा; केबल ऑपरेटरची मागणी

मुंबई : गेल्या दोन महिन्यात नवीन कोणतेही कार्यक्रम प्रसारित न झाल्याने करमणूक व क्रिडा वाहीन्यांनी शुल्क माफ करावे किंवा जास्तीची सूट द्यावी अशी मागणी केबल ऑपरेटर्सनी केली आहे. यासाठी केबल ऑपरेटर संघटनेने इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशन (आयबीएफ) चे अध्यक्ष एनपी सिंग यांना पत्र लिहीले आहे. या पत्रातून महाराष्ट्र केबल ऑपरेटर फाउंडेशनने एप्रिलपासून जुलै या चार महिन्यांच्या वाहीनी शुल्कात माफी किंवा सूट मागितली आहे.

“जवळपास दोन महिन्यांपासून सर्व वाहिन्यांचे रिसायकलिंग म्हणजेच जूने कार्यक्रम वाहीन्यांवर दाखवले जात आहे. शिवाय नवीन कार्यक्रमाचे शुटींग आणि ते कधी प्रसारित होतील याबाबत काहीही निश्चितता नाही. (सामान्य करमणूक वाहिन्या) स्पोर्ट्स आणि सिनेमा चॅनेलचीही अशीच स्थिती आहे. असेही या पत्रात नमूद केले आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या हातात हे पत्र आले आहे.

या पत्रात महाराष्ट्र केबल ऑपरेटर्सच्या मते जर आपण जर या वाहीन्यांवरील शुल्क माफ अथवा कमी केले नाही तर यूजर केबल काढून टाकतील. तसेच, ग्राहक ऑपरेटरला पैसे देण्यास असमर्थ असतानाही मल्टी-सिस्टम ऑपेराटर्स (एमएसओ) कडून ऑपरेटरला पैसे भरण्यास भाग पाडतील अशी अडचण केबल ऑपरेटरने पत्रातून ब्रॉडकास्ट अध्यक्षांकडे मांडली आहे.

तर, जुलैच्या मध्यात परिस्थितीचा आढावा घेऊन वास्तविक स्थिती पाहून यावर निर्णय घेतला जाईल, असे प्रभू म्हणाले आहेत.

वाहीन्यांवरील शुल्कात जास्तीची सूट देणे वा माफ करणे यामुळे आपण ग्राहक टिकवू शकू व जाहीरांतीचे उत्पादन शुल्कही कमी होणार नाही याची पूढे काळजी घेता येईल असे या पत्रात म्हटले आहे.

या कठीण परिस्थितीत महाराष्ट्र केबल ऑपरेटरलाही चॅनलच्या प्रमोशनवर मिळवलेले इन्सेनटीव्हदेखील गमवावावे लागत आहे. प्रभू म्हणाले, देशभरातील लॉकडाऊनमुळे साधारणतः 60 टक्के ऑपरेटर थकबाकी वसूल करू शकले नाही. कोविड -19 मुळे देशात लॉकडाऊन असल्याने मार्चच्या मध्यापासूनच केबल ऑपरेटर ग्राहकांकडून थकबाकी मागू शकले नाहीत. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत ही थकबाकी वसूल करण्याचा प्रयत्न केला असता कोरोनाच्या भीतीने कोणीही त्यांना घराच्या दारातही प्रवेश देत नाहीत. अशा स्थितीत ब्रॉडकास्ट फाऊंडेशनने केबल ऑपरेटरची अडचण समजून घ्यावी व वाहीनींवरील शुल्क माफ करावे अशी विनंती कोेबल ऑपरेटरने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button