Politicsराजकारण

खडसेंप्रमाणे योग्यवेळी इतर नेत्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे  माझ्या संपर्कात नाहीत. मात्र, इतर नेते संपर्कात आहेत. एकनाथ खडसेंचा ज्याप्रमाणे प्रवेश झाला तसे इतर नेते योग्य वेळ आल्यावर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

यापुढे बोलताना पाटील म्हणाले की, पंकजा मुंडे यांनी नेहमीच शरद पवार यांच्याबद्दल आदर केला आहे. ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नावर पंकजा मुंडे यांचे वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्याशी बोलून प्रश्न मार्गी लावले आहेत. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नामध्ये कधीही राजकारण दिसून आले नाही.

यावेळी त्यांनी राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांच्या नेमणुकीवरही भाष्य केले. राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांच्या नेमणुकीमध्ये उशीर झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत गुरुवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. विधानपरिषदेच्या जांगावरुन कोणतेही मतभेद नाहीत. कोरोनामुळे निर्णय घेण्यात उशीर झाला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकावण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले होते. यावर बोलताना जयंत पाटील यांनी म्हटले की, प्रत्येक राजकीय पक्षाला अपेक्षा बाळगणे गरजेचे असते. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना दिलेल्या आदेशामध्ये काही वावगं वाटत नाही. प्रत्येकाला ज्यांचा त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. असही त्यांनी स्पष्ट केलं.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय आरोग्य मिशन ही केंद्र सरकारच्या योजनेत ४०० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना  लिहिले आहे. याविषयी विचारले असता जयंत पाटील यांनी याबाबत कल्पना नसल्याचे सांगितले. देवेंद्र फडणीस कोरोना झाल्यामुळे रुग्णालयात आहेत. ते लवकर बरे व्हावे अशा आमच्या सदिच्छा आहेत, असं जयंत पाील यांनी म्हटलं.

दरम्म्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यकाळाबद्दल लिहिलेल्या पुस्तकाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लिहिलेल्या पत्रावर बोलण्यास जयंत पाटील यांनी नकार दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button