FeaturedMaharashtra Govमुंबई

कोरोना खेड्यात पोहचला ; महाराष्ट्रात आंतरजिल्हा प्रवास बंदी !

मुंबई : गेल्या दोन आठवड्यांत ग्रामीण महाराष्ट्रात कोरोना प्रकरणांमध्ये तीव्र वाढ नोंदली गेली असून, स्थानिक अधिका -यांनी आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी देण्याच्या राज्याच्या निर्णयावर ठपका ठेवला आहे. प्रवास परवानगी मिळाल्याने मुंबई, पुणे येथून मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या गावी गेलेत. प्रवासबंदी हटवल्याने उस्मानाबाद, सातारा, सांगली आणि पुणे ग्रामीण या जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची मोठ्या संख्येने वाढ झाली आहे, असे अधिका-यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. या जिल्ह्यांमधील बहुतेक नवीन रूग्ण हे मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर अशा शहरांमधून परत आलेले लोक आहेत.

अधिका-यांच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र सरकारने आता आपत्कालीन किंवा वैद्यकीय कारणांशिवाय आंतरजिल्हा प्रवास प्रतिबंधित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी जिल्हाधिका-यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला यादरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी आंंतरजिल्हा प्रवासबाबत सुचना केल्यात. असे अधिका-यांनी सांगितले.

प्रवासबंदी हटवल्य़ाने जिल्हांतर्गत प्रवाशांची संख्या वाढली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर यासारख्या हॉट स्पॉट्समधून लोकांनी खेड्यात मूळ गावी जाणे पसंत केले परंतू यामुळे खेड्यात कोरोनाचा प्रसार झाल्याचे सर्व जिल्हाधिका-यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना सांगितले.

महाराष्ट्र शासनाने ११ मेपासून आंतरजिल्हा प्रवासास मान्यता दिली असून त्यानंतरच ग्रीन झोन असलेल्या तसेच ग्रामीण भागातील प्रकरणांमध्ये काही दिवसांतच निश्चित वाढ झाली. असे अधिका-यांनी सांगितले. उदाहरणार्थ सांगलीमध्ये 17 मे पर्यंत 42 कोविड प्रकरणे नोंदली गेली; ती आता १०१ वर पोचली आहे. उस्मानाबादमध्ये ही संख्या सात वरून 54 आणि बीडमध्ये तीन वरून 411 झाली आहे. तसेच, गडचिरोलीसारख्या ग्रीन झोन जिल्ह्यातही प्रवासबंदी हटल्यानंतरच कोरोनाचे रुग्ण सापडले आहे.

दरम्यान, जिल्हाधिका-यांनी दिलेल्या माहिती नंतर आता मुख्यमंत्री ठाकरेंनीही त्यांना जिल्हाबंधी कायम करण्य़ाविषयी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुचना केल्या आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही लेखी सुचना नाही.
सदर वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button