Health & FitnessMaharashtra Govऔरंगाबाद (Auragabad)

औरंगाबाद : कोविड रूग्णालय १० दिवसात सुरू

औरंगाबाद : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील सिपेटची इमारत कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरीत करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. या हॉस्पिटलवर एमआयडीसी सहा ते सात कोटी रूपयांचा खर्च करत आहे. ते हॉस्पिटल येत्या १० दिवसात पालिकेला सुपूर्द करण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री तथा उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांनी कळवली आहे.

कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी २५० खाटांचे कोविड हॉस्पिटल येथे असेल. तेथे वीज, पाणी, ड्रेनेज सुविधांचे काम सुरू आहे. शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रात विनावापर राहीलेल्या पूर्वीच्या मेल्ट्रॉन कंपनीच्या इमारतीत कोविड केअर सेंटर (हॉस्पिटल) उभारण्यास सुरूवात केली आहे

औरंगाबाद जिल्ह्यात आज 22 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकुण संख्या 1327 एवढी झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे जुना मोंढा (1), बायजीपुरा (1), रोहिदासपुरा (1), कांचनवाडी (1), भारतमाता नगर हडको(1), नवीनवस्ती जुनाबाजार (4), जुना हनुमान नगर (1), हनुमान चौक (1), न्याय नगर (1), कैलाश नगर (1), रामनगर (1), एन 8 सिडको (4), रोशन गेट (1), एन11 सुभाषचंद्र नगर (1), पुंडलीक नगर (1), भवानी नगर (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 11 महिला आणि 11 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button