Maharashtra Govमुंबईसोशल मीडिया

देवेंद्र फडणवीस यांची सलून व्यावसायीकांशी चर्चा, राज्यसरकरकडे पाठपुरावा करणार

मुंबई : राज्यात 1 जून पासून अनलॉक – 1 सुरू झाला आहे. जवळपास सर्वच किरकोळ व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. किरकोळ दुकानदार, मॉल्सदेखील उघडले आहेत. मात्र. यातून सलून व्यावसायीकांना वगळून पार्लर, सलूनवरील निर्बंध अद्याप काय ठेवले आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सलून व्यवसायीक राज्य सरकरावर नाराज आहेत. तसेच, सलून व्यावसायीकांनाही दुकाने उघडण्याची परवानगी द्या अन्यथा आंदोलन करू असा इशारा नाभिक संस्था प्रतिनिधींनी दिला. त्यानंतर काल रात्री माजी मुख्यमंत्री देवेंद्र, विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील विविध नाभिक समाजातील संस्थांचे प्रतिनिधी तसेच राज्यातील सलून/वेलनेस उद्योगांतील प्रतिनिधींशी चर्चा केली. व त्यांच्या समस्या जाणून सलून व्यावसायीकांच्या बाबत राज्य सरकारकडे आपण पाठपुरावा करणार असे आश्वासन दिले.

देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील विविध नाभिक समाजातील संस्थांचे प्रतिनिधी तसेच राज्यातील सलून/वेलनेस उद्योगांतील प्रतिनिधींशी आज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमांतून चर्चा केली. वेलनेस अ‍ॅम्बेसेडर रेखाताई चौधरी यांनी ही चर्चा घडवून आणली.

गावांगावांतील केश कर्तनालयापासून ते शहरांतील मोठ्या सलूनपर्यंत या व्यवसायात सुमारे 20 लाख लोकांना रोजगार प्राप्त होतो. कोरोना प्रादुर्भाव, टाळेबंदी आणि त्यानंतर हळूहळू सूट देण्याचा क्रम यात केंद्र सरकारने या व्यवसायाला सूट दिली आहे.

अन्य राज्यांनी सुद्धा या व्यवसायाला सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र महाराष्ट्रात अजून सूट देण्यात आलेली नाही. त्यामुळे बेरोजगारीची मोठी कुर्‍हाड या व्यवसासायावर, या व्यवसायात काम करणार्‍यांवर कोसळते आहे. हे सारे गरिब अथवा मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत.

इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील व्यवसायिकांनी सुद्धा हा व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वत:चे प्रोटोकॉल्स तयार केले आहेत. त्याचे पालन करून व्यवसाय सुरू करण्याची अनुमती द्यावी, ही त्यांची मागणी आहे. याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांना दिल्याचे फडणवीस यांनी फेसबूक पोस्ट मध्ये लिहीले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button