FeaturedFinanceलाईफस्टाईलशिक्षण

तुमच्या छंदातून कमवा फायदा !

छंद हा प्रत्येकालाच असतो. कामाव्यतिरिक्त आपण आपल्या छंदातून आपली करमणूक करत असतो. छंद हा कुठलाही असू शकतो. अगदी झाड लावण्यापासून ते पुस्तक वाचे पर्यंत. बरेच लोक हे ९ ते ५ म्हणजेच 9 To 5 Job मध्ये अडकलेले असतात. चौकटीत बसून काम करायचं सरळ आयुष्य जगायचं ही काहींची भावना असते. तेच तेच काम करून आयुष्याला एकप्रकारची संथगती येते. म्हणजेच आपण मोनोटोनस आयुष्य जगतो. तर काहीना अस आयुष्य जगायचं नसत मग ते छंद जोपासतात आणि त्यातून विरंगुळा मिळवतात. मग अचानक एक दिवस असा येतो की त्यांना वाटत की आपण आपल्या या छंदाला आपल आयुष्य वाहून दिले पाहिजे.

मग ह छंद हा कधी व्यवसायात बदलतो हे कळत नाही. पण छंद हा व्यवसायात बदल्यावर त्यातून फायदा मिळवणे हेही तितकेच अवघड काम. पण जगात अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही. तर मग जाणून घेऊया या छंदाच्या व्यवसायाला फायद्यात कसे बदलायचे

१. तुम्हाला पहिले कुठला छंद हा फायदेशीर ठरतो ते ठरवावे लागेल
छंद बरेच असतात पण त्यातील कोणता व्यवसायात बदल्यावर फायदा होऊ शकतो याचे पहिले वर्गीकारण करा. लेखन, स्वयंपाक बनवणे, असे छंद जोपासून यातून तुम्ही पैसे ही कमवू शकतात . डिजिटल मिडिया मुळे या काळात काहीच असे अशक्य राहिले नाही आहे. सुचत नसेल तर सर्च करून प्रत्येक गोष्टीचा प्रश्न तुम्ही सोडवू शकता.

२. पहिले व्यवसाय हा मोफत ठेवा !
जेव्हा तुम्ही तुमचा व्यवसाय चालू कराल तो पहिले मोफत ठेवा. असे केल्याने तुम्हाला तुमचे संपर्क वाढवता येतील आणि तुमच्या व्यवसायाचा प्रसार होईल. जसा की तुम्ही लेखन करताय मग ते पहिले मोफत करून द्या आणि नंतर त्यातून फी आकारायला सुरुवात करा. यात तुमचा वेळ जाईल पण तुमच्या व्यवसायाचा प्रसार होईल

३. ‘ टार्गेट ऑडीयन्स’ शोधा !
याची परिभाषा म्हणजे तुमच्या व्यवसाय हा कुठल्या वयोगटातील लोकांना फायदेशीर ठरेल असे बघा. जसे की तुम्ही मातीच्या खेळण्यांचा व्यवसाय काढला तर तुमचा टार्गेट ऑडीयन्स या लहान मुलांच्या आई असतील. अशा रीतीने तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकतात.

४. डीस्काउंट ठेवा
जर तुमचा नुकताच व्यवसाय सुरु झला आहे तर तुम्ही फायद्याचा विचार न करता तो पहिले वाढवला पाहिजे. त्यावर तुम्ही २० टक्के जरी ऑफ दिला तरी लोक हे घ्यायला मागे पडतील हे लक्षात ठेवा.

५. थेंबे थेंबे टाळे साचे !
नुकताच तुमचा व्यवसाय जर चालू झाला असेल तर तो लगेच तुम्हाला नफा होणार नाही वरील उक्तीप्रमाणे तुम्हाला वेळ द्यावा लागेल. तर धीराने वागा तुमचा छंद हा नक्कीच तुमचा व्यवसाय बनू शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button