निद्रानाशामधून ‘या’ उपायांनी सुटका मिळू शकते!
बर्याच लोकांची झोप न येणे ही नेहमीची तक्रार असते. झोप येत नाही म्हणून मोबाईल पाहत राहणे, टीवी बघत राहणे मग डोळे थकल्यावर झोप येणे असा बहुतांश लोकांचा दिनक्रम असतो. यात रात्री पूर्ण झोप न मिळाल्यामुळे माणूस सकाळी चिडचिडा होतो. कधी कधी पित्त आणि डोकेदुखी सुद्धा खूप होते. ही झोप न येणे हा कदाचित निद्रानाशाचा प्रकार असू शकतो. या धकाधकीच्या जीवनात निद्रानाश हा खूप सामान्य आजार झाला आहे. पण याचे दुरोगामी परिणाम शरीरवर दिसून येतात.
आपल्याला साखर झोप लागावी म्हणून बरेच उपाय आपण घरबसल्या करू शकतो.
१. जास्तीत जास्त सूर्यप्रकाश किंवा कृत्रिम प्रकाशात राहा
होय, आपल्या मेंदूची अशी धारणा असते की त्याचे शरीराचे घड्याळ हे ठरलेले असते. तुमचा मेंदू तुम्हाला सांगतो केव्हा झोपायचे आणि केव्हा उठायचे. एका सर्वेक्षणात असे दिसून आले की ज्यांना निद्रानाशाचा त्रास होता ते लोक जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहिल्यावर त्यांना रात्री झोप ही लवकर आली.
२. कॅफेन युक्त पदार्थ आहारात न आणणे
तुमची दिवसाची सुरुवात चहा आणि कॉफी ने होते का? प्रत्येकाचीच होते. पण जास्त कॅफेन घेतल्याने आपली शरीराची नर्व्हस सिस्टीम ही तरतरीत राहते व लवकर झोप लागत नाही. अशी उत्तेजानार्थक पेये पिणे म्हणजे झोपेला टाळणे असेच म्हणता येईल. या पेयां शिवाय तुम्ही हळद दुध, सुंठ दुध किंवा ग्रीन टी सारखा पौष्टिक चहा सुद्धा घेऊ शकतात.
३. दुपारची वामकुक्षी टाळणे
बर्याच लोकांना दुपारी जेवून एक ते दोन तासांची वामकुक्षी घेण्याची सवय असते. पण ज्यांना निद्रानाशाचा त्रास असतो त्यांनी ही वामकुक्षी टाळावी. अर्धा तास किवा १ तास एवढी वामकुक्षी शरीराला हितकारकच असते पण त्यापेक्षा जास्त दुपारची झोप ही हानिकारक असते.
४. मद्यपान रात्री न करणे
रात्री झोपताना मद्यपान करण्याची सवय ही बर्याच जणांना असते पण यामुळे निद्रानाशाचा आजार उत्भावू शकतो. मद्यामुळे शरीरातील मेलाटोनीन ची पात्रता कमी होऊन झोप कमी लागते व निद्रानाश होतो.
५. संध्याकाळी अंघोळ करणे
संध्याकाळी अंघोळ करण्यामुळे शरीराला नक्कीच आराम मिळू शकतो आणि झोपही नीट लागू शकते . त्यामुळे ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांनी संध्याकाळी कोमट पाण्याने अंघोळ करा जेणेकरून चांगली झोप लागेल.
६. व्यायाम करणे
व्यायाम हा शरीरासाठी कधी ही चांगलाच. निद्रनाशाचा ज्यांना त्रास आहे त्यांनी रोज सकाळी किंवा संध्याकाळी व्यायाम करा ज्यामुळे झोप व्यवस्थित लागेल. पण एक लक्षात ठेवा की जेवल्यानंतर व्यायाम करू नका नाहीतर त्याचा उलट परिणाम होऊ शकतो.

