२०१८ मध्येच भरले होते वर्षा बंगल्याचे पाणी बिल
सकाळपासून सुरु असलेल्या वर्षा बंगल्याच्या पाणी बिलावरील चर्चेवर आता मात्र माहिती व जनसंपर्क संचालनाने पुर्णविराम लावला आहे. माहिती व जनसंपर्क संचालनाच्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचे पाणी बिल हे नोव्हेंबर २०१८ मध्येच भरलेले असल्याचे समोर आले. ‘मुख्यमंत्री व मंत्रीमहोदयांच्या शासकीय निवासस्थानांच्या पाण्याची देयके नोव्हेंबर २०१८ मध्येच भरण्यात आली होती. तथापि जुनी भरलेली देयके व मे २०१९ मध्ये प्राप्त झालेल्या देयकांमध्ये ही देयके अदा करण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली होती. संपूर्ण हिशोब केल्यानंतर ही देयके भरण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात येते. या निवासस्थानामध्ये मंत्री महोद्यांनशिवाय त्यांच्या कर्मचारी वर्गासाठीही घरे असतात. तसेच यामध्ये अभ्यंगतांचाही समावेश असतो. पाणी आणि विजपुरवठ्याचे देयके बंगल्याच्या नावावर येतात. ती कोणत्या विशिष्ट व्यक्तीच्या नावावर येत नाही. त्यामुळे ती विशिष्ट व्यक्तीने थकवली असे म्हणणे संयुक्तिक नाही.’ असे देखील माहिती व जनसंपर्क संचालनाने आपल्या ट्विटर अकाउंट वरून ट्विट करत सांगितले.

