युवासेना सचिव, नगरसेवक पूर्वेश प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने ठाणे महानगरपालिकेमध्ये भारतातील पहिल्या स्मार्ट टॉयलेटचे उद्घाटन
ठाणे – ठाणे महानगरपालिकेने या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात एक पाऊल पुढे टाकत मुख्यालयात प्रथमच स्मार्ट टॉयलेट कार्यान्वित केले. महानगरपालिका मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर हे आधुनिक स्मार्ट टॉयलेट बांधण्यात आले आहे. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्री संजीव जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या स्मार्ट टॉयलेटचे उदघाटन केले गेले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना स्वतःची स्वच्छता प्रणाली (self cleaning system) साबण, पाणी स्वच्छता, ऑटोमॅटिक लाईट्स सह वीज आणि पाण्याची बचत, बायोडिग्रेडेबल प्लास्टिक आसन कव्हरसह स्वच्छता राखली जाते. ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी या स्मार्ट टॉयलेट बांधण्यासाठी पुढाकार घेऊन तत्कालीन मुख्य शहर अभियंता श्री. अनिल पाटील व विद्यमान मुख्य शहर अभियंता श्री. खडताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्मार्ट टॉयलेट प्रकल्प पूर्ण करण्यात आला.
सदर कामी मुख्यालय दुरुस्ती विभागाचे श्री. महेश बोराडे यांनी देखील सहकार्य केले. ठाण्यातील श्री. कौस्तुभ धोंडे व श्री. अभिषेक शिंदे या दोन तरुणांनी विविध तंत्रांचा उपयोग करून भारतामध्ये प्रथमच आशाप्रकारचे स्मार्ट टॉयलेट तयार केले व ठाणे महापालिकेने ते कार्यान्वित केले.

