Travel
राज्यातील रिक्षा चालकांचा संप मागे, मुख्यमंत्र्यांबरोबर आज होणार बैठक
महाराष्ट्रातील रिक्षा चालक विविध मागण्यांची पूर्तता होण्यासाठी संपावर जाणार होते. मात्र जनतेची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाप्रमाणे ८ जुलै मध्यरात्रीपासून होणारा हा संप मागे घेत असल्याचे ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले.
रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या दालनात आज मंगळवारी, ९ जुलै रोजी दुपारी ३ वाजता बैठक आयोजित केली आहे. असे देखील त्यांनी सांगितले. या बैठकीत रिक्षा भाडेवाढीसह राज्यातील अवैध वाहतुकीस आळा घालणे, रिक्षाचालकांसाठी महामंडळ स्थापन करणे या मुद्द्यांवर चर्चेतून तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे.
