Travel
शिवनेरीच्या तिकीट दरात कपात
एसटीची नावलौकिक असलेल्या सेवा ‘शिवनेरी’ व ‘अश्वमेध’ या गाड्यांच्या तिकीट दरात ८० ते १२० रुपयांपर्यंत कपात करण्यात आल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. नवे तिकीट दर ८ जुलैपासून लागू होणार आहेत. मुंबई-पुणे मार्गावर धावणारी ‘शिवनेरी’ या मार्गावरील अन्य सेवांच्या तुलनेत किफायतशीर आणि आरामदायी आहे. सध्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ७ मार्गांवर शिवनेरीच्या दिवसभरात ४३५ फेऱ्या होतात. मागील काही काळात मुंबई-पुणे मार्गावर कमी दरात चालणाऱ्या ओला, उबरसारख्या टॅक्सी सेवेमुळे शिवनेरीच्या प्रवासी संख्येवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. तिकीट दर कमी केल्यामुळे हा प्रवासीवर्ग सुद्धा शिवनेरीकडे वळेल असा विश्वास दिवाकर रावते यांनी व्यक्त केली.
